RRC CR Apprentice Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मध्ये रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीची जाहिरात ही सेंट्रल रेल्वे(RRC CR Apprentice Bharti ) अंतर्गत प्रसिद्ध झालेली असून यामध्ये तब्बल 2412 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीसाठी अर्ज करताना लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील इतर नियम आणि अटी खाली दिलेली आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज 11 सप्टेंबर 2025 पर्यंत करायचा आहे.त्यानंतर अर्ज करता येणार नाही. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: अप्रेंटिस
- एकूण जागा: 2412 जागा.
- शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण/ संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय आवश्यक आहे.
- मासिक वेतन: खाली दिलेली मूळ जाहिरात सविस्तर वाचा.
- वयोमर्यादा:
- उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे.
- SC ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट असेल.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट असेल.
RRC CR Apprentice Bharti 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 2412 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.आपला अर्ज करण्यापूर्वी मूळ pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
- भरती विभाग: सेंट्रल रेल्वे (RRC CR Apprentice Bharti ) मध्ये नोकरीची संधी.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: अधिकृत pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- अर्ज शुल्क:
- खुला गट/OBC उमेदवारांसाठी 100 रुपये.
- SC/ST/अपंग/महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क सूट.
- अर्ज करण्यास सुरुवात: 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
RRC CR Apprentice Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांची पात्रता,अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे आणि निवड पद्धतीशी संबंधित सर्व बाबींमध्ये रेल्वे प्रशासनाचा निर्णय अंतिम असेल.
- रेल्वेमध्ये प्रशिक्षण देणे उमेदवारांना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर रेल्वेमध्ये सामावून घेण्याचा कोणताही अधिकार देणार नाही. कामगार मंत्रालयाने 15 जुलै 2025 रोजी अधिसूचित केलेल्या अप्रेंटिसशिप नियम,1991 च्या अनुसूची पाचच्या परिच्छेद-10 नुसार, नियोक्त्याने अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अप्रेंटिसला कोणताही रोजगार देणे बंधनकारक राहणार नाही.
- नियुक्तीसाठी कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
- कोणत्याही स्वरूपात उमेदवारी रद्द केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि या प्रकरणात गैरवापर स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खात्री करावी की तो पात्रता आणि इतर निकष पूर्ण करतो. चुकून नियुक्ती झाल्यास,अशा उमेदवारांना कोणत्याही टप्प्यावर सूचना न देता थोडक्यात काढून टाकले जाईल.
- जर उमेदवार पडताळणीसाठी आवश्यक मूळ दाखले सादर करू शकला नाही किंवा इतर कोणतीही विसंगती आढळली तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. जर रेल्वे प्रशासनाला असे लक्षात आले की अर्जदाराने खोटे प्रमाणपत्रे सादर केली आहेत, तर रेल्वे प्रशासन निवडलेल्या उमेदवाराला प्रशिक्षणासाठी निवडल्यानंतरही कोणत्याही टप्प्यावर सूचना न देता सोडण्याचा अधिकार राखून ठेवते.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
RRC CR Apprentice Bharti 2025
ही जाहिरात पण बघा: सरकारी नोकरी: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025!State Bank of India Bharti 2025
आपल्या मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
1 thought on “मध्ये रेल्वे भरती 2025| 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी|RRC CR Apprentice Bharti 2025”