Power Grid Corporation of India Limited Bharti 2025: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही महारत्न दर्जाची खूप मोठी कंपनी आहे.सदर भरतीमध्ये तब्बल 01543 जागा भरण्यात येत आहेत.त्यामुळे पात्रता धारक उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.सदर. भरतीसाठी (Power Grid Corporation of India Limited Bharti 2025) उमेदवारांना ऑनलाईन (online)पद्धतीने अर्ज करायचे आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती यांविषयी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- एकूण जागा: 01543 जागा
- मासिक वेतन: दरमहा 23,000 रुपये ते 1,20000 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा:
- खुला गट उमेदवारांसाठी:29 वर्ष
- OBC उमेदवारांसाठी: 32 वर्ष
- SC/ST उमेदवारांसाठी: 34 वर्ष
पदांचा तपशील:
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | फील्ड इंजिनिअर(इलेक्ट्रिकल) | 532 |
02 | फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) | 198 |
03 | फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) | 535 |
04 | फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) | 193 |
05 | फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन) | 85 |
शैक्षणिक पात्रता:
- फील्ड इंजिनिअर(इलेक्ट्रिकल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिक शाखेतून BE/BTech/Bsc engineering पदवी उत्तीर्ण असावी.तसेच 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- फील्ड इंजिनिअर (सिव्हिल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल शाखेतून BE/BTech/Bsc engineering पदवी उत्तीर्ण असावी.तसेच 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिक शाखेतून डिप्लोमा उत्तीर्ण असावे.तसेच 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- फील्ड सुपरवायझर (सिव्हिल): मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल शाखेतून डिप्लोमा उत्तीर्ण असावे.तसेच 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
- फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन): मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक/कम्युनिकेशन/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा उत्तीर्ण असावे.तसेच 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात पॉवर ग्रीड POWERGRID कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
Power Grid Corporation of India Limited Bharti 2025
- भरती विभाग: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन (POWERGRID) ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी:सदर भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने (Contract) मानधन तत्वावर करण्यात येणार आहे.
- नोकरी ठिकाण: भारतातील विविध राज्यामध्ये काम करण्याची संधी.
📑अर्ज शुल्क:
- फील्ड इंजिनिअर पदासाठी: 400 रुपये शुल्क.
- फील्ड सुपरवायझर पदासाठी: 300 रुपये शुल्क.
- SC/ST/माजी सैनिक/अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क सूट असेल.
🗓️महत्वाच्या तारखा:
- अर्ज सादर करण्यास सुरुवात: 27 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
📍निवड पद्धती:
- ऑनलाईन परीक्षा
- प्रत्यक्ष मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
📑आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचा अलीकडचा पासपोर्ट साइज फोटो व स्वाक्षरी.
- जन्मतारखेचा पुरावा म्हणून 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे जसे गुणपत्रक/प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- जातीचा दाखला (राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी)
- अपंग प्रमाणपत्र(लागू असल्यास आवश्यक असेल.)
🔶निवड झाल्या नंतर होणारे इतर फायदे:
- पॉवरग्रिडच्या (POWERGRID)HRA नियमांनुसार HRA दिले जाईल.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्याच्या धोरणानुसार अधिकृत मोबाइल कॉल शुल्क/भाडे मिळणार आहे.
- उमेदवारांना एका वर्षात 12 दिवसांची कॅज्युअल रजा, 10 दिवसांची आजारी असल्यास रजा आणि 30 दिवसांची अर्जित रजा मिळेल.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना लग्नाच्या पहिल्या वर्षात स्वतःसाठी आणि लग्नाच्या दुसऱ्या वर्षापासून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी (पती/पत्नी आणि दोन अवलंबून मुले) वैद्यकीय लाभ मिळणार आहे.
- उमेदवारांना पॉवरग्रिडच्या गट वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा मूळ वेतनाच्या 12% दराने PF कपात आणि महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
Power Grid Corporation of India Limited Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर आवश्यक पात्रता:
- सदर भरतीसाठी वरील सर्वच पदाकरीता 01 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.(शैक्षणिक पात्रतेनुसार)
🟡अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या https://www.powergrid.in/ अधिकृत संकेतस्थळ वरती भेट द्या.
- Apply Online वरती क्लिक करा आणि आपली माहिती व्यवस्थित रित्या अपलोड करा.
- पदाच्या आवश्यकतेनुसार सर्व योग्य ते कागदपत्रे स्पष्ट अपलोड करा.
- ऑनलाईन अर्ज भरून अर्ज शुक्ल (POWERGRID) भरावे.त्यानंतर अर्जाची प्रिंट घ्यावी.ज्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा असतो.अर्जाची प्रिंट कॉपी परीक्षा होई पर्यंत जपून ठेवावी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी नोंद घ्या की,सदर भरतीसाठी केवळ (Power Grid Corporation of India Limited Bharti 2025) ऑनलाइन पद्धतीने (Online) अर्ज करायचे आहेत.
- त्यानंतर वय आणि पद पात्रता अनुभव इत्यादी सर्व गणना ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 17 सप्टेंबर.2025 रोजी असेल.
- जर कोणतेही प्रमाणपत्र हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेत जारी केले असेल, तर उमेदवारांना मुलाखत ,कागदपत्र पडताळणीच्या वेळी, जर मागणी केली असेल तर, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत त्याचे प्रमाणित भाषांतर सादर करण्याचा सल्ला दिला जातो याची नोंद घ्या.
- सदर भरती साठी, परीक्षा केंद्र, ठिकाणाची माहिती उमेदवारांना कळवली जाईल. फक्त अनुसूचित जाती/जमाती/अपंगत्व असलेल्या उमेदवारांनाच परीक्षेला बसण्यासाठी सर्वात कमी मार्गाने स्लीपर क्लास रेल्वे बस भाडे परतफेड केली जाईल, जर ते निर्धारित निकष पूर्ण करत असतील तरच असेल.
- सदर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सूचना न देता किंवा सामील झाल्यास उमेदवारी नाकारली जाऊ शकते.
- जर उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.
- अर्ज शुल्क सादर केल्यानंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाईल, जिथे लागू असेल तिथे.
- अपूर्ण अर्ज,तसेच शुल्काशिवाय अर्ज नाकारले जातील.
- लेखी परीक्षेदरम्यान, उमेदवाराने त्यांच्या संबंधित रोल नंबरच्या समोर दिलेल्या जागेवर बसणे आवश्यक आहे.
- जागा बदलणे, हॉलमध्ये गोंधळ निर्माण करणे, नोट्सची देवाणघेवाण करणे, एकमेकांशी सल्लामसलत करणे/बोलणे/कोणत्याही गैरप्रकार आणि कोणत्याही स्वरूपात प्रश्नांची नक्कल करणे इत्यादींमुळे परीक्षा हॉलमधून थोडक्यात काढून टाकले जाईल.तसेच उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन न करणे आणि इतर शिस्तभंगाच्या कारवाईचा परिणाम होईल.
- उमेदवारांनी परीक्षेदरम्यान कोणताही अडथळा निर्माण करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. अशा उमेदवारांना POWERGRID च्या भविष्यातील परीक्षांपासून वंचित ठेवले जाऊ शकते. आणि अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई सुरू केली जाऊ शकते. आवश्यकता भासल्यास, कोणतीही सूचना न देता किंवा त्यानंतर कोणतेही कारण न देता,निवड प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार व्यवस्थापन राखून ठेवते.
- नमूद केलेल्या रिक्त जागांची संख्या तात्पुरती आहे. जी बदलू शकते आणि पॅनेलचे कामकाज आवश्यकतेनुसार अवलंबून असेल हे लक्षात घ्या.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
ही जाहिरात पण बघा: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025|सरकारी नोकरीची सुवर्णसंधी|मासिक वेतन: दरमहा 64,280 रुपये.
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
2 thoughts on “नवीन:पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025|Power Grid Corporation of India Limited Bharti 2025”