NIACL Bharti 2025: तुमची पदवी पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर ही जाहिरात तुमच्यासाठी कारण पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त पदासाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL Bharti 2025) ही भारत सरकारच्या मालकीची एक अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी आहे. तसेच ही भारतातील सर्वात मोठी सामान्य विमा कंपनी आहे. सदर भरती ही NIACL च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीच्या जाहिराती विषयी सविस्तर तसेच शैक्षणिक पात्रता आणि निवड पद्धती यांविषयी अधिक माहिती खाली देण्यात आली आहे. सदर भरतीसाठी 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी
- एकूण जागा: 0550 जागा.
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर/पदव्युत्तर पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समकक्ष पात्रतेची किमान पात्रता असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षेत किमान 60% गुणांसह (SC/ST/PWD उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत.)
- इतर पात्रता: मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
- मासिक वेतन: दरमहा 22,405 रुपये ते 62,265 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.(अधिकृत जाहिरात वाचा.)
- वयोमर्यादा:
- उमेदवारांचे वय 01 ऑगस्ट 2025 पर्यंत 21 वर्ष ते 30 वर्ष दरम्यान असावे.
- OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट.
- SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट.
NIACL Requirment 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | प्रशासकीय अधिकारी | 0550 |
(⚠️अत्यंत महत्वाचे: सदर भरती ही न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.मूळ जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा यासाठी होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
- भरती विभाग: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- भरती कालावधी: सुरुवातीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किमान 05 वर्षेसाठी निवड केली जाणार आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचे आहेत.
- निवड पद्धती:
- पूर्व परीक्षा (Prelims)
- मुख्य परीक्षा (Mains)
- मुलाखत (Interview)
- अर्ज शुल्क:
- सामान्य प्रवर्ग तसेच OBC/EWS उमेदवारांसाठी 850/- रुपये शुल्क.
- SC/ST/PWD उमेदवारांसाठी 100/- रुपये शुल्क.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
- अर्ज करण्यास सुरुवात: 07 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
- ऑनलाईन परीक्षा तारीख:
- पूर्व परीक्षा 14 सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षा 29 ऑक्टोबर 2025
आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांनी प्राप्त केलेले पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- उमेदवारांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
- उमेदवारांचे स्व:लिखित घोषणापत्र.
- चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल आयडी अनिवार्य आहे.
- इतर आवश्यक कागदपत्रांसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
🔕उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- कृपया लक्षात ठेवा की येथे नमूद केलेले पात्रता निकष हे या पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत.
- मुलाखतीच्या वेळी, उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये दर्शविल्याप्रमाणे, त्यांची ओळख आणि पात्रता सिद्ध करण्यासाठी मूळ कागदपत्रे
- आणि स्वतः साक्षांकित केलेली छायाप्रत प्रत सादर करणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही टप्प्यावर अर्जाच्या डेटामध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- पदासाठी अर्ज करणे आणि ऑनलाइन परीक्षेत आणि त्यानंतरच्या मुलाखतीत किंवा त्यानंतरच्या प्रक्रियांमध्ये शॉर्टलिस्ट होणे याचा अर्थ असा नाही की,उमेदवाराला कंपनीत नोकरीची ऑफर दिली जाईल. अर्ज केलेल्या पदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही श्रेणी/पदाखाली उमेदवारी विचारात घेण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
ही जाहिरात पण बघा: नवीन: नवीन: आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती 2025
ही जाहिरात आपल्या मित्र मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा 👇
1 thought on “न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड भरती 2025|NIACL Bharti 2025 आजच अर्ज करा”