Navi Mumbai Mahanagar Palika Bharti :- 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली असून ही भरती तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने करावयाची आहे. वैद्यकीय अधिकारी BAMS या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview) दि.29/07/2025 रोजी घेण्यात येईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह आरोग्य विभाग, 3 रा मजला, नर्मुमपा मुख्यालय.या ठिकाणी उपस्थित राहावे.अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा होणार नाही. निवड प्रक्रिये दरम्यान कोणत्याही वेळी किंवा उमेदवाराच्या निवडी नंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमदेवाराची/निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.या जाहिराती विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात सविस्तर वाचावी.
पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी (BAMS)
एकूण जागा:- 044
- शैक्षणिक पात्रता:-
- मान्यता प्राप्त विदयापीठाची बी.ए.एम.एस. पदवी.
- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी बंधनकारक
- शासकीय/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
नोकरी ठिकाण:- नवी मुंबई
मासिक वेतन:- 25000/- + रु.15000/-(PBI): रु. 40,000/- दरमहा दिले जाईल.
अर्ज पद्धती :– ऑफलाईन
भरती कालावधी :- तात्पुरत्या स्वरूपात
नविड प्रक्रिया:- प्रत्येक्ष मुलाखतीद्वारे
PDF जाहिरात येथे उपलब्ध | येथे बघा |
अधिकृत संकेस्थळ | येथे बघा |
मुलाखतीची तारीख:- 29 जुलै 2025
मुलाखतीची पत्ता:- 3 रा मजला, नर्मुमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे उपस्थित रहावे.
🔕उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना :-
सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीताउमदेवारांनीhttps://www.nmme.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.