Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025: मीरा भाईंदर महानगर पालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळसेवा अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येत असून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ही मीरा भाईंदर महानगर पालिका (Mira Bhaindar Mahanagarpalika) अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.सदर भरतीमध्ये एकूण 0358 रिक्त पदे भरण्याचे निर्देशांक देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना 12 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.भरतीसंदर्भात तसेच निवड पद्धती यांविषयी सविस्तर माहिती खाली pdf जाहिरातीमध्ये दिलेली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी अशी सूचना करण्यात येत आहे.
- पदाचे नाव: गट क संवर्गातील विविध रिक्त पदे.
- एकूण जागा: 0358 जागा
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
- मासिक वेतन: दरमहा 19,900रु ते 1,12400 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष दरम्यान असावे.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 27 |
02 | कनिष्ठ अभियंता (मॅसेनिकल) | 02 |
03 | कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 01 |
04 | लिपीक टंकलेखक | 03 |
05 | सर्वेक्षक | 02 |
06 | नळ कारागीर (प्लंबर) | 02 |
07 | फिटर | 01 |
08 | मिस्त्री | 02 |
09 | पंपचालक | 07 |
10 | अनुरेखक | 01 |
11 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 01 |
12 | कनिष्ठ अभियंता संगणक प्रोग्रामर | 04 |
13 | स्वच्छता निरीक्षक | 05 |
14 | चालक/यंत्रचालक | 14 |
15 | सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी | 06 |
16 | अग्निशामक | 241 |
17 | उद्यान अधीक्षक | 03 |
18 | लेखापाल | 05 |
19 | डायलेसिस तंत्रज्ञ | 03 |
20 | बालवाडी शिक्षिका | 04 |
21 | परिचारिका/स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ/G.N.M | 05 |
22 | ANM | 12 |
23 | औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी | 05 |
24 | लेखापरीक्षक | 01 |
25 | वायरमन | 01 |
26 | औषध निर्माता | 05 |
27 | ग्रंथपाल | 01 |
(‼️अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात मीरा भाईंदर महानगरपालिकाच्याअधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025
- भरती विभाग: मीरा भाईंदर महानगरपालिकाअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: उमेदवारांना कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
- नोकरी ठिकाण: मीरा भाईंदर महानगरपालिका.
- अर्ज शुल्क:
- सामान्य गट उमेदवारांसाठी: 1000 रुपये शुल्क
- SC/ST मागासवर्ग उमेदवारांसाठी:900रुपये शुल्क.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी: शुल्क माफ असेल.
🗓️महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: 22 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
- ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:12 सप्टेंबर 2025
📚निवड पद्धती:
सरळसेवा परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांना कळविण्यात येती की,वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांनध्ये वाढ,घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे.
- उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यापुर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहीत अर्हता अटींची पुर्तता करीत असून सदर पदाकरीता ते पात्र आहेत.
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध (Valid) ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी (Mobile No.) असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेची तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार असल्याने, भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- संबंधित पदाच्या परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा, अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता ग्राहय धरली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
- अराखीव (खुला) पदांकरीता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा (मागासवर्ग उमेदवारांसह) विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मुळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.
- अर्ज सादर केलेल्या उमेदवारांस प्राथमिक छाननीच्या आधारे परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल. त्यामुळे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला तरी आवश्यक ती शैक्षणिक व इतर अर्हता असल्याशिवाय व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय निवडीस पात्र राहणार नाही, केवळ परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे उमेदवारांस निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी पात्रतेच्या अटी अभ्यासूनच अर्ज करावा.
- महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापुर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव) त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे जसे विवाह नोंदणी दाखला, राजपत्र सादर करणे अनिवार्य राहिल.
- पत्रव्यवहारासाठी स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये लिहावा, व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, स्वयं अध्ययन मार्गदर्शन केंद्र/वर्ग अथवा तत्सम स्वरुपाच्या कोणत्याही मार्गदर्शक केंद्राचा संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये.
- अर्जामध्ये दिलेली माहिती व मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान काही कागदपत्रे संशयास्पद वाटली अथवा सादर केलेल्या कागदपत्रांतील माहिती व मूळ (Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025)अर्जातील माहिती यामध्ये फरक आढळून आल्यास अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी आहे असे समजण्यात येईल. आवश्यकतेनुसार मुळ शैक्षणिक / इतर कागदपत्रांची संबंधील शैक्षणिक विद्यापीठ संस्था यांच्याकडे तपासणी करण्यात येईल. तसेच उमेदवार अर्जामधील माहिती संदर्भातील कागदोपत्री पुरावे सादर करु न शकल्यास उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
2 thoughts on “नवीन: मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2025|Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2025”