WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

नवीन:महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025|MAHA Security Bharti 2025

MAHA Security Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये “सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी” हे रिक्त पदे भरण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य(MAHA Security Bharti 2025) सुरक्षा महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • पदाचे नाव: सहसंचालक आणि सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी.
  • एकूण जागा: 09 जागा.
  • शैक्षणिक पात्रता: पदवी (मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी)
  • मासिक वेतन: दरमहा  45,000 रुपये ते  50,000 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 61 वर्ष दरम्यान असावे.

MAHA Security Bharti 2025

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या
01 सहसंचालक  01
02 सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी  08

 

(अत्यंत महत्वाचे:सदर भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवारांनी मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचूनच आपला अर्ज करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

  • भरती विभाग: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
  • निवड कालावधी: केवळ कंत्राटी तत्त्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • निवड पद्धती: उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्यास सुरुवात: 20 ऑगस्ट 2025 पासून अर्ज सुरू.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.

MAHA Security Bharti 2025

📑अर्ज करण्याचा पत्ता: 

पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ,01,32 वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई –400005.

📍मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण:

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.सेंटर – 01,32 मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई- 400005

📚मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :-

  1. उमेदवारांची वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
  2. शैक्षणिक पात्रता  कागदपत्रे
  3. सेवानिवृत्त प्रमाणपत्र / सेवानिवृत्ती ओळखपत्र
  4. निवृत्ती वेतन पुस्तिकेची प्रत आवश्यक आहे.
  5. उमेदवारांचा फोटो /पैन कार्ड / आधार कार्ड
  6. मागील पाच वर्षाचे ACR आवश्यक आहे.

MAHA Security Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025

⚠️ उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना:

  1. इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी महामंडळाबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी महामंडळाचे संकेतस्थळ https://mahasecurity.gov.in यावर भेट द्यावी.
  2. उमेदवारांनी सोबतच्या विहित केलेल्या नमुन्यात त्यांचे अर्ज BIO-DATA पोस्टाने किंवा प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून सादर करावेत,अशी सूचना देण्यात आली आहे.
  3. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणा-या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात येईल.
  4. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  5. मुलाखतीसाठी येताना सेवानिवृत्ती ओळखपत्र, पेन्शन पुस्तिका व शैक्षणिक अर्हता विषयक सर्व कागदपत्राच्या मुळ प्रती, BIO-DATA व त्याच्या 02 छायांकित प्रती आणाव्यात.
  6. मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल,
  7. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
  8. उमेदवारांना दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने 11 महिन्यासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार पुनर्नियुक्ती दिली जाईल.
  9. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.

 

ही जाहिरात पण बघा:  बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी|पंजाब अँड सिंध बँक भरती 2025|आजच आपला अर्ज करा 

 

 

 

 

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत नक्की शेअर करा 👇

1 thought on “नवीन:महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2025|MAHA Security Bharti 2025”

Leave a Comment