Government Ashram School Bharti 2025: आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रम शाळांसाठी नवीन शिक्षक भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.शिक्षक होण्याचे स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांची नोकरीची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती ही छत्रपती शिवाजी महाराज स्वय रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंतर्गत होणारा आहे.आदिवासी विकास विभागाच्या नाशिक आणि ठाणे विभागात एकूण 695 शिक्षक पदे भरण्यात येणार आहेत.ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर करण्यात येत आहे.भरती संदर्भात सविस्तर (Government Ashram School Bharti 2025) माहिती खाली देण्यात आली आहे.सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच भरती संदर्भातील नियम आणि अटी खाली दिलेले आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- एकूण जागा: 0695 जागा
- मासिक वेतन: अधिकृत जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
- वयोमर्यादा: उमेदवारांच्या वय संदर्भात कोणतीही सूचना जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेली नाही.
पदांचा तपशील:
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | उच्च माध्यमिक शिक्षक | 67 |
02 | माध्यमिक शिक्षक | 92 |
03 | पदवीधर प्राथमिक शिक्षक | 88 |
04 | प्राथमिक शिक्षक 448 | 448 |
शैक्षणिक पात्रता:
- उच्च माध्यमिक शिक्षक: MA/MSC (विशेष विषय – गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) आणि B.ed उत्तीर्ण अनिवार्य आहे.
- माध्यमिक शिक्षक: BA /BSC (विशेष विषय – इंग्रजी/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र / जीवशास्त्र) आणि B.ed उत्तीर्ण अनिवार्य आहे.
- पदवीधर प्राथमिक शिक्षक: BA/HSC/D.ed उत्तीर्ण अनिवार्य आहे.
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम): HSC आणि डी.एड आणि टीईटी-1 /सीटीईटी अनिवार्य आहे./(इंग्रजी माध्यम)
- प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम): HSC आणि डी.एड आणि टीईटी-1 / सीटीईटी अनिवार्य आहे. (मराठी माध्यम)
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
Government Ashram School Bharti 2025
- भरती विभाग: श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: सदर भरती ही केवळ कंत्राटी (Contact) पद्धतीने मानधन तत्वावर होत आहे.
- नोकरी ठिकाण: नाशिक व ठाणे विभागातील विविध आश्रम शाळा (महाराष्ट्र)
📑अर्ज शुल्क:
सदर भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.त्यामुळे सर्व सामान्य उमेदवारांना सुद्धा चांगली संधी मिळणार आहे.
🗓️महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरुवात: 29 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
📍निवड पद्धती:
- लेखी परीक्षा (Written Exam)
- मुलाखत ( interview)
📚आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचे शैक्षणिक पात्रतेनुसार गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
- उमेदवारांचे डोमासाईल.
- TET/CTET गुणपत्रक.
- उमेदवारांचा बायोडाटा
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- पासपोर्ट साइज फोटो असावा.
Government Ashram School Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
🔶इतर आवश्यक पात्रता:
- पदवीधर प्राथमिक शिक्षकासाठी CTET/TET-1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी/मराठी माध्यम) साठी CTET/TET-1 उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
(टीप: आदिवासी भागात शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.तसेच अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि स्थानिक उमेदवारांना किंवा आजूबाजूच्या भागातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)
📑अर्ज कसा करावा:
- सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यासाठी वरील लिंक वरती क्लिक करून,प्रथम उमेदवारांनी आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
- त्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक तसेच वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे.
- उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यावी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत.त्यामुळे उमेदवानी आपली माहिती न चुकता व्यवस्थित रित्या भरायची आहे.
- उमेदवारांनी आपला अर्ज करत असताना,अचूक व संपूर्ण अर्ज करावा.अपूर्ण केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. हे लक्षात असावे.
- त्याचबरोबर ही भरती बाह्य संस्थामार्फत होत असून केवळ कंत्राटी पद्धतीने होणार आहे.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- भरती मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्याचा निवडी नुसार जवळील शासकीय आश्रम शाळेमध्ये रुजू करून घेतले जाईल.त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करत असतांना योग्य तो आणि जवळील शाळा निवडायची आहे
- सदर भरती संदर्भात निवड व अधिक सूचना,तसेच हक्क राखीव ठेवण्यात येतील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
Government Ashram School Bharti 2025
ही जाहिरात पण बघा:सरकारी:इंडियन आर्मी भरती 2025|सैन्य दलात नोकरीची संधी|वेतन: 61,000 रुपये
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
I have bsc degree MSc and b.ed