WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

सरकारी:जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर भरती 2025|District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025

District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025:जिल्हा एड्स  प्रतिबंध व नियंत्रण विभाग अंतर्गत जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगरमध्ये  रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी मिळणार आहे.सदर भरतीची (District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025) जाहिरात जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगरच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ही भरती केवळ कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहे.त्यामुळे भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच निवड पद्धती यांविषयी अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे.त्याच बरोबर इतर नियम आणि अटी देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी अशी सूचना करण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण जागा: 02 जागा
  • मासिक वेतन: दरमहा 21,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: अधिकृत संकेतस्थळला भेट द्या.

पदांचा तपशील:

पद क्रं पदाचे नाव  पद संख्या 
01 डाटा मॅनेजर  01
02 औषध निर्माता  01

 

शैक्षणिक पात्रता: 

  1. डाटा मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण तसेच पदासह संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा / प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  2. औषध निर्माता: मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसीमध्ये पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असावे.

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगरच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025

  • भरती विभाग: जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन  (Offline)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी:सदर भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने (Contract) मानधन तत्वावर करण्यात येणार आहे.
  • नोकरी ठिकाण: जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर.

📑अर्ज शुल्क: 

  1. सदर भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही,त्यामुळे सर्व सामान्य उमेदवारांना उत्तम संधी आहे.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. अर्ज करण्यास सुरुवात: 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
📍निवड पद्धती: 
  1. लेखी परीक्षा (Written Exam)
  2. प्रत्यक्ष मुलखात (Interview)

🔶आवश्यक कागदपत्रे: 

  1. उमेदवारांचा अलीकडचा पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.
  2. जन्मतारखेचा पुरावा म्हणून 10 वी उत्तीर्ण गुणपत्रक/प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  3. पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे जसे गुणपत्रक/प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  4. उमेदवारांचे अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र सोबत आणावे.

District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

📚इतर आवश्यक पात्रता: 

  1. डाटा मॅनेजर: डेटा व्यवस्थापनात कामाचा अनुभव आणि आरोग्याशी संबंधित सॉफ्टवेअरचे कामाचे ज्ञान.सांख्यिकी/गणितात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  2. औषध निर्माता: आरोग्य सेवेचा अनुभव. आणि संबंधित राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आणि संगणक ज्ञान सीसीसी / MSC-IT आवश्यक आहे.
📑अर्ज पाठवण्याचा पत्ता : 

कक्ष क्रमांक 33, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तारकपूर, सावेदी रोड अहिल्यानगर, 41001

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. सदर भरती मध्ये देण्यात आलेल्या वरील पदांसाठी सविस्तर जाहीरात (मार्गदर्शक सूचना, पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना ई.) www.ahmednagar.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  2. उमेदवारांचे ईमेल द्वारा पाठविण्यात आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. प्राप्त अर्जाची छाणनी करुन पात्र उमेदवारांची वरील पदांसाठी लेखी परिक्षा घेण्यात येईल व लेखी परिक्षेतील गुणानुक्रमे 01 पदास 05 प्रमाणे मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
  3. सदर (District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025) पदभरतीमधील पदांची संख्या कमी किंवा जास्त करणे तसेच पदभरती रद्द करणेबाबतचे सर्व हक्क राखीव आहेत.
  4. सविस्तर माहीतीकरिता कृपया www.ahmednagar.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी. सदर पद करारतत्वांवर असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम तीन महिन्यांकरिता कंत्राटी पध्दतीने करारतत्वावर नियुक्ती देण्यात येईल. व पुढील नियुक्ती या कालावधीतील त्यांचे काम व वर्तणूक यांचे मुल्याकंन करुन देण्यात येईल.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

District Civil Hospital Ahilyanagar Bharti 2025 

ही जाहिरात पण बघा:पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025|मासिक वेतन:23,000 रुपये ते 1,20000 रुपये पर्यंत 

 

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

Leave a Comment