BEL Requirement 2025: चांगल्या वेतनाची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.कारण भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये एकूण 0610 पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली देण्यात आले आहे.उमेदवारांना आपला अर्ज 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत करता येणार आहे.अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
BEL Requirement 2025
- पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी अभियंता-I (Trainee Engineer-I)
- एकूण जागा: 0610 रिक्त पदे
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत
- मासिक वेतन: दरमहा 30,000/- रुपये ते 40,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
पदनिहाय तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | प्रशिक्षणार्थी अभियंता-I (Trainee Engineer-I) | 0610 |
शैक्षणिक पात्रता
सदर भरतीसाठी खालील शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे
| पद | पात्रता |
| प्रशिक्षणार्थी अभियंता-I (Trainee Engineer-I) | B.E./B.Tech/B.Sc.(04 वर्षांचा अभ्यासक्रम)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/महाविद्यालयातून संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. |
(⚠️अत्यंत महत्वाचे:सदर भरतीची जाहिरात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (BEL) अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी मूळ pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या गैरसजासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही )
BEL Requirement 2025
- भरती विभाग: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- निवड कालावधी: सरकारी विभागात कायमस्वरूपी (Permenent) नोकरी मिळवण्याची चांगली संधी
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
- वयोमर्यादा: सदर भरतीसाठी उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 वर्ष ते 28 वर्षे दरम्यान असावे.(SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट.OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क
- General, EWS आणि OBC उमेदवारांसाठी 177/- रुपये शुल्क
- SC/ST/ PWD उमेदवारांसाठी शुक्ल नाही
महत्वाच्या तारखा
| अर्ज करण्यास सुरुवात | 24 सप्टेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 ऑक्टोबर 2025 |
| ऑनलाईन शुल्क करण्याची शेवटची तारीख | 12 ऑक्टोबर 2025 |
निवड प्रक्रिया
- पात्रता निकष पूर्ण करणारे आणि ज्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले गेले आहेत.अशा उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी तात्पुरते शॉर्टलिस्ट केले जाईल.
(टीप: उमेदवारांची लेखी परीक्षा ही फक्त बेंगळुरू येथेच होईल.याची नोंद घ्यावी)
आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक ते गुणपत्रे/प्रमाणपत्र आवश्यक आहेत.(मूळ pdf जाहिरात बघा)
अर्ज कसा करावा
- पात्रता धारक उमेदवारांनी https://jobapply.in/BEL2025BNGComplex वेबसाईट वरती क्लिक करून Registration करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर उमेदवारांची सविस्तर माहिती भरून घ्यायची आहे.व शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- ऑनलाईन Payment करून अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्यायची आहे,व जपून ठेवायची आहे.
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
BEL Requirement 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांना सदर भरतीसाठी केवळ ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सदर भरतीसाठी वर दर्शविलेल्या पदांची संख्या, निवडीच्या वेळी प्रत्यक्ष आवश्यकतेनुसार बदलू शकते.
- वरील बाबींमध्ये कोणतीही सुधारणा, स्पष्टीकरण, परिशिष्ट,शुद्धीपत्रक,वेळ वाढवणे इत्यादी
- जाहिरात फक्त BEL वेबसाइटच्या “Career” विभागात प्रकाशित केली जाईल: https://bel-india.in त्यासाठी कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज सदर करताना कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची टाकलेली आहे असे आढळून आल्यास त्याची निवड/पात्रता रद्द केली जाईल.
- उमेदवारांनी प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवास करण्यास तयार असले पाहिजे. उमेदवारांना भारतात कुठेही,कधीही नियुक्त केले जाऊ शकते.म्हणून, अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी
- प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण भारतात स्थलांतर करण्यास तयार असले पाहिजे.
- उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ई-मेल (Email ID)आयडी आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराच्या पात्रतेबाबत, पात्रतेची तपासणी कोणत्या टप्प्यांवर करायची आहे, पात्रता आणि इतर पात्रता निकष यासंबंधीच्या सर्व बाबींमध्ये बीईएलचा (BEL) निर्णय अंतिम आणि उमेदवारावर बंधनकारक असेल.
- सरकारी नियमानुसार SC/ST/OBC/PwBD वर्गातील उमेदवारांना सवलती लागू असतील.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी.
निष्कर्ष:
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक भारत सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून,पात्रता धारक उमेदवारांना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.तसेच BEL ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे.म्हणून उमेदवारांनी आपला अर्ज 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन करून घ्यायचा आहे.
ही जाहिरात पण बघा: स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC)भरती 2025|तब्बल:07565 रिक्त पदे|पात्रता:12 वी उत्तीर्ण
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा 👇
