Bank of Maharashtra Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे? कारण बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)ही अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँक आपला व्यवसाय व राष्ट्रीय विस्तार वेगाने वाढवत आहे.तसेच डिजिटल परिवर्तन आणि आधुनिक बँकिंग तंत्रज्ञान वापरणारी अग्रगण्य सरकारी बँक आहे. सदर भरती ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून,पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.भरती संदर्भात सविस्तर माहिती तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व नियम आणि अटी खाली दिलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
- एकूण जागा: 0500 जागा
- भरती विभाग: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- मासिक वेतन: दरमहा 64,820 रुपये ते 93,960 रुपये
- वयोमर्यादा:
- उमेदवारांचे वय 22 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असावे.
- SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट राहील.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट राहील.
Bank of Maharashtra Bharti 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | जनरलिस्ट ऑफिसर | 0500 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरती ही बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवारांनी सविस्तर pdf जाहिरात वाचूनच आपला अर्ज करावा. कोणत्याही गैरसमजासाठी किंवा नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही)
- शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी / एकात्मिक दुहेरी पदवी किमान 60% गुणांसह
- सर्व सत्रे / वर्षांच्या एकूण गुणांमध्ये (SC/ST/OBC/ PwBD 55%)
- मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचा.
- इतर पात्रता: कोणत्याही अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि अनुसूचित खाजगी क्षेत्रातील बँकेत अधिकारी म्हणून 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपला ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: बँकिंग क्षेत्रात कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
- अर्ज शुल्क:
- जनरल/OBC/EWS: उमेदवारांसाठी 1180 रुपये.
- SC/ST/PWD: उमेदवारांसाठी 118 रुपये.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
- निवड पद्धती:
- ऑनलाईन परीक्षा (Online Exam)
- मुलाखत (Interview)
- परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर अधिकृत वेबसाईट वरती कळविण्यात येईल.
- अर्ज करण्यास सुरुवात: 13 ऑगस्ट 2025 पासून अर्ज सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
Bank Of Maharashtra Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक झाली |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचा संक्षिप्त रिज्युम (PDF)
- ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट/आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदार ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स/ इतर आवश्यक आहे.
- जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा SSC/इयत्ता दहावी जन्म तारीख असलेले प्रमाणपत्र.
- शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित गुणपत्रिका/ पदवी प्रमाणपत्र.
- उमेदवाराचे दहावी प्रमाणपत्र तसेच बारावी प्रमाणपत्र/डिप्लोमा प्रमाणपत्र.
- अनुभव प्रमाणपत्रे असायला हवे.
- जात प्रमाणपत्र जसे की ,SC/ST/OBC EWS प्रमाणपत्र,लागू असल्यास.
- अपंगत्व प्रमाणपत्र.
- अधिक माहितीसाठी pdf जाहिरात सविस्तर वाचा.(Bank of Maharashtra Bharti 2025)
⚠️उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी त्यांच्या पात्रतेबद्दल स्वतःची खात्री करून घ्यावी. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) ऑनलाइन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे आवश्यक शुल्क भरून पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना चाचणीसाठी प्रवेश देईल आणि मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता निश्चित करेल आणि त्यानंतर भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर पडताळणी करू शकेल.
- उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या हितासाठी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि इंटरनेटवरील जास्त भार किंवा वेबसाइट जाममुळे डिस्कनेक्शन / अक्षमता / वेबसाइटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहू नये.
- वरील कारणांमुळे किंवा बँक ऑफ महाराष्ट्रच्या नियंत्रणाबाहेरील इतर कोणत्याही कारणास्तव उमेदवारांना अंतिम तारखेच्या आत त्यांचे अर्ज सादर करता न आल्यास बँक ऑफ महाराष्ट्र कोणतीही जबाबदारी घेत नाही.
- उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत.
- परीक्षेच्या व्यवस्थापनात काही समस्या उद्भवण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, ज्यामुळे चाचणी निकाल निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकरणांमध्ये, समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, ज्यामध्ये आवश्यक वाटल्यास दुसरी परीक्षा आयोजित करणे समाविष्ट असू शकते.
- निवड झाल्यास, उमेदवारांना नियुक्ती घेताना नियोक्त्याकडून योग्य डिस्चार्ज प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- मुलाखतीच्या तारखेला पडताळणीसाठी पात्रता निकषांसंबंधी मूळ कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा सादर करावा. मुलाखतीच्या तारखेला पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास उमेदवाराला मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- मुलाखतीसाठी बोलावल्यास, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात सादर करावे लागेल.
- ओबीसी श्रेणी अंतर्गत आरक्षण मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात एक घोषणापत्र सादर करावे लागेल ज्यामध्ये क्रिमी लेयरशी संबंधित नाहीत असे नमूद करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
Bank Of Maharashtra Bharti 2025
ही जाहिरात पण बघा:सरकारी: भारतीय रेल्वे बोर्ड भरती 2025|तब्बल:0434 रिक्त पदे.
आपल्या परिसरातील मित्र मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा 👇
1 thought on “नवीन:बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025| Bank Of Maharashtra Bharti 2025”