WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

सरकारी:राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025|National Health Mission Bharti 2025

National Health Mission Bharti 2025National Health Mission Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने (National Health Mission Bharti 2025)एकुण 30 रिक्त जागा भरण्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध केली आहे.सदर भरती ही केवळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर होत आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या निर्देशांक देण्यात आले आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • एकूण जागा: 30 जागा
  • मासिक वेतन: दरमहा 17,000 रुपये ते 60,000 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 38 वर्ष सूट 43 वर्ष दरम्यान असावे.

National Health Mission Bharti 2025

पदांचा तपशील:

पद क्रं  पदाचे नाव  पद संख्या 
01 वैद्यकीय अधिकारी  10
02 स्टाफ नर्स (स्त्री) 06
03 स्टाफ नर्स (पुरुष)  01
04 ए.एन.एम (ANM)  10
05 औषध निर्माता  03

 

  • शैक्षणिक पात्रता: 

  1. वैद्यकीय अधिकारी: मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी./ महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी अनिवार्य आहे.
  2. स्टाफ नर्स (स्त्री): 12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.sc नर्सिंग कोर्स उत्तीर्ण/महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे.
  3. स्टाफ नर्स (पुरुष) :12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ डिप्लोमा किंवा B.sc नर्सिंग कोर्स उत्तीर्ण/महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधनकारक आहे.
  4. ए.एन.एम (ANM):10 वी पास आणि ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण/महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी बंधनकारक
  5. औषध निर्माता : 12 वी + डी. फार्म किंवा बी. फार्म पदवीधर/महाराष्ट्र कौन्सिलची नोंदणी बंधनकारक

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)

National Health Mission Bharti 2025

  • भरती विभाग:नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM)अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन (offline)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: सदर भरती केवळ कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर करण्यात येत आहे.
  • नोकरी ठिकाण: नवी मुंबई महानगरपालिका.
  • अर्ज शुल्क: सदर भरतीसाठी कोणत्याही अर्ज शुल्क नाही,त्यामुळे चांगली संधी आहे.

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. अर्ज सादर करण्यास सुरुवात: 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025.
  3. प्रत्यक्ष मुलाखतीची तारीख: 10 सप्टेंबर 2025 (वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता)

📚निवड पद्धती: 

  1. वैद्यकीय अधिकारी या पदाची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. स्टाफ नर्स, ए.एन.एम.(ANM)व औषधनिर्माता पदाकरीता गुणांकन पध्दतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल.

📑आवश्यक कागदपत्रे: 

  1. उमेदवारांचा वयाचा पुरावा म्हणून (10 वी गुणपत्रक)
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र,कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable) आवश्यक आहे.
  3. शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे आवश्यक आहेत.
  4. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  5. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  6. नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  7. उमेदवारांचा आधारकार्ड,पॅनकार्ड असावा.
  8. उमेदवारांचा सध्याचा फोटो
  9. अर्जदार विवाहीत असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) आवश्यक आहे.
  10. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र किंवा (प्रतिज्ञापत्र)
  11. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र.
📑अर्ज सादर करण्याचा पत्ता :

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग,3 रा मजला, नर्मुमपा मुख्यालय, प्लॉट नं.01,से.15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614

National Health Mission Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा

 

📍इतर आवश्यक पात्रता: 

  1. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय व निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राहय धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची गणना करण्यात येणार नाही.
  2. ज्या पदाकरीता अर्ज केला (NUHM)आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेला अनुभवच ग्राहय धरण्यात येईल, या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
  1. सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमदेवारांनी nmmc.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
  2. जाहिरातीत नमुद केलेली पदे ही पूर्णतः कंत्राटी(NUHM) स्वरुपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. या पदांचा राज्य शासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून, उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाही.
  3. जाहिरातीत नमुद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
  4. निवड झालेल्या उमेदवारांना पदे रिक्त असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक आहे.
  5. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती 2025

ही जाहिरात पण बघा: इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025|वेतन:25,000 ते 81,100 रु|सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची संधी.

 

आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

1 thought on “सरकारी:राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती 2025|National Health Mission Bharti 2025”

Leave a Comment