WhatsApp Icon
 
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025|Thane DDC Bank Bharti 2025

Thane DDC Bank Bharti 2025: ठाणे मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.बँकिंग क्षेत्रात नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती ही ठाणे मध्यवर्ती(Thane DDC Bank Bharti 2025) सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये एकूण 0165 रिक्त पदे भरण्याचे निर्देशांक देण्यात आलेले आहेत.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

  • पदाचे नाव:बँकिंग क्षेत्रातील विविध रिक्त पदे.
  • एकूण जागा: 0165 जागा
  • शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
  • मासिक वेतन: दरमहा 15,000 रुपये ते 20,000रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 21 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे.

Thane DDC Bank Bharti 2025

पदांचा तपशील:

पद क्रं  पदांचे नाव पद संख्या 
01 ज्यु.बँकिंग असिस्टंट 123
02 शिपाई  36
03 सुरक्षारक्षक 05
04 वाहनचालक 01

 

(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)

Thane DDC Bank Bharti 2025

  • भरती विभाग: ठाणे मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
  • अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
  • निवड कालावधी: उमेदवारांना कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
  • नोकरी ठिकाण: ठाणे.

📑अर्ज शुल्क:

  1. ज्यु. बँकींग असिस्टंट : 944 रुपये शुल्क
  2. शिपाई : 590 रुपये शुल्क
  3. सुरक्षारक्षक : 590 रुपये शुल्क
  4. वाहन चालक : 590 रुपये शुल्क

🗓️महत्वाच्या तारखा:

  1. ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2025 (5:30pm)पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
  3. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:29 ऑगस्ट  2025.

📚निवड पद्धती:

  1. संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा
  2. मुलाखत
  3. कागदपत्रे पडताळणी.

Thane DDC Bank Bharti 2025

अधिकृत संकेतस्थळ  येथे क्लिक करा
सविस्तर pdf जाहिरात  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा

 

⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:

  1. उमेदवारांना कळविण्यात येती की,वरील सर्व पदांसाठी अर्ज फक्त ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  2. पात्रता धारक उमेदवारांना मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  3. ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपुर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलाविले जाईल.(Thane DDC Bank Bharti 2025)त्यावेळी उमेदवारांना सर्व मुळ कागदपत्रे घेऊन हजर राहणे बंधनकारक राहील. कागदपत्र पडताळणीवेळी प्रोव्हीजनल प्रमाणपत्र ग्राहय धरले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेतुन बाद समजण्यात येईल.
  4. उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा व कागदपत्रे पडताळणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
  5. उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःची पूर्ण माहिती बिनचूक भरावी.
  6. उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने ठाणे शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र परिक्षार्थीची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार इतर शहरातील केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल.
  7. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचावी.

 

 

ही जाहिरात पण बघा: खुशखबर:मीरा भाईंदर महानगर  पालिका भरती 2025| सरळसेवेद्वारे भरती प्रसिद्ध|आजच आपला अर्ज करा.

 

 

 

आपल्या मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇

 

 

Leave a Comment