Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका आस्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदांची सरळसेवा अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.सदर भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येत असून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ही भरती नागपूर महानगरपालिका (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025) अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे.त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत.सदर भरतीमध्ये एकूण 0174 रिक्त पदे भरण्याचे निर्देशांक देण्यात आलेले आहेत. उमेदवारांना 09 सप्टेंबर 2025 पर्यंत आपले अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.भरतीसंदर्भात तसेच निवड पद्धती यांविषयी सविस्तर माहिती खाली pdf जाहिरातीमध्ये दिलेली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावी अशी सूचना करण्यात येत आहे.
- पदाचे नाव: गट क संवर्गातील विविध रिक्त पदे.
- एकूण जागा: 0174 जागा
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार( मूळ pdf जाहिरात वाचावी.)
- मासिक वेतन: दरमहा 19,900 रुपये ते 1,22,800 रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा: उमेदवारांचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष दरम्यान असावे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
- पदांचा तपशील:
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कनिष्ठ लिपीक | 60 |
02 | विधी सहायक | 06 |
03 | कर संग्राहक | 74 |
04 | ग्रंथालय सहायक | 08 |
05 | स्टेनोग्राफर | 10 |
06 | लेखापाल रोखपाल | 10 |
07 | सिस्टीम ॲनॉलिस्ट | 01 |
08 | हार्डवेअर इंजिनियर | 02 |
09 | डेटा मॅनेजर | 02 |
10 | प्रोग्रमर | 01 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिकाच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे,उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपला अर्ज सादर करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
- भरती विभाग: नागपूर महानगरपालिकाअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online)पद्धतीने भरायचे आहेत.
- निवड कालावधी: उमेदवारांना कायमस्वरूपी (Permenent)नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी.
- नोकरी ठिकाण: नागपूर.
📑अर्ज शुल्क:
- सामान्य गट उमेदवारांसाठी: 1000 रुपये शुल्क
- SC/ST मागासवर्ग उमेदवारांसाठी:900रुपये शुल्क.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी: शुल्क माफ असेल.
🗓️महत्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात: 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज करता येतील.
- ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:09 सप्टेंबर 2025
📚निवड पद्धती:
सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात परीक्षा घेण्यात येईल.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
🔶आवश्यक कागदपत्रे:
- उमेदवारांचे अधिवास प्रमाणपत्र पुरावा आवश्यक आहे.
- ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे पॅन कार्ड/ड्रायव्हिंग/लायसेन्स/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट किंवा बँक पासबूक यापैकी किमान कोणतेही एक फोटो असलेले मूळ ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांचा कोणताही एक वयाचा पुरावा आवश्यक आहे.
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा आवश्यक आहे.
- अधिकृत pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- उमेदवारांना कळविण्यात येती की,वरील सर्व पदांसाठी अर्ज फक्त नागपूर महानगरपालिकेचे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्जदाराने त्याचे पात्रते संदर्भातील सर्व आवश्यक मुळ दस्ताऐवज / प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणीचे वेळो उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.आणि महाराष्ट्रात 15 वर्ष अधिवास अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा (Domicile) करीत असल्याबाबत त्याने सक्षम प्रधिकरणाचे किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याबाबत जन्मदाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराने ऑनलाईन परिक्षेची प्रवेशपत्रे, परिक्षेचे वेळापत्रक, बैठकव्यवस्था, कागदपत्रे, पदताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, निवेदने, तात्पुरती निवड व अतिरिक्त सूची, अंतिम निवड व अतिरिक्त सूची व इतर सर्व सुचना हया वेळोवेळी नागपूर(Nagpur Mahanagarpalika Bharti 2025)महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील त्याबाबत उमेदवारांसोबत पत्रव्यवहार अथवा वेगळयाने संपर्क केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी भरतीप्रक्रीया पूर्ण होईपर्यन्त वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पहाव्यात.
- वरील नमूद पदावर अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीपूर्वी उमेदवाराची नागपूर महानगरपालिकेचे रुग्णालय मार्फत वैद्यकिय तपासणी केली जाईल व त्यामध्ये वैद्यकिय दृष्टया पात्र झाल्यानंतर नियुक्ती दिली जाईल. उमेदवारांनी नौकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती ही अंतिम समजण्यात येईल. अर्जातील माहिती बदलाबाबत नंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकारल्या जाणार नाही.अथवा बदल विचारात घेतले जाणार नाही.
- निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवारांची निवड झाल्यावर किंवा नियुक्ती दिल्यानंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांचे अर्जात व ऑनलाईन परिक्षेचे वेळी दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्यास निवड रद्द करण्यात येईल.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करावा.
नागपूर महानगरपालिका भरती 2025
ही जाहिरात पण बघा: .खुशखबर:मीरा भाईंदर महानगर पालिका भरती 2025| सरळसेवेद्वारे भरती प्रसिद्ध|आजच आपला अर्ज करा.
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा.👇
Need this job