BSF Bharti 2025: 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय सैन्य दलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.कारण BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.BSF ही भारताची पहिली सीमासुरक्षा दल आहे, जी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते,तसेच जगातील सर्वात मोठी सीमासुरक्षा दल आहे.BSF अंतर्गत तब्बल 1,121 पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीसाठी (BSF Bharti 2025) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत. पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक.
- एकूण जागा: 11,21 जागा
- शैक्षणिक पात्रता: 10 वी/12 वी/ ITI
- मासिक वेतन: दरमहा 25,500 रुपये ते 81,100 रुपये पर्यंत देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा:
- सामान्य गट उमेदवारांसाठी: 18 वर्षे ते 25 वर्षे.
- OBC उमेदवारांसाठी: 18 वर्षे ते 28 वर्षे.
- SC/ST उमेदवारांसाठी: 18 वर्षे ते 30 वर्षे.
BSF Requirment 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) | 0910 पदे |
02 | हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) | 0211 पदे |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरतीची जाहिरात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स च्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात सविस्तर वाचूनच करावा.कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा गैरसमजासाठी आमची टीम जबाबदार असणार नाही)
- भरती विभाग: BSF अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- निवड कालावधी: कायमस्वरूपी (Permanent)नोकरीची चांगली संधी आहे.
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
- अर्ज शुल्क:
- OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी: 100 रू शुल्क.
- SC/ST, महिला, विभागीय, माजी सैनिकांसाठी: अर्ज शुल्कामध्ये सूट आहे.
- अर्ज करण्यास सुरुवात: 24 ऑगस्ट 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
Border Security Force Bharti 2025
इतर आवश्यक पात्रता:
- हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर): भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य किंवा रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयारी आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये आयटीआय (ITI)असणे आवश्यक आहे.
- हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक): भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये एकूण 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा रेडिओ आणि टेलिव्हिजन किंवा जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयारी आणि संगणक सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रिशियन किंवा फिटर किंवा माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल किंवा संप्रेषण उपकरणे देखभाल किंवा संगणक हार्डवेअर किंवा नेटवर्क तंत्रज्ञ किंवा मेकाट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये आयटीआय (ITI)असणे आवश्यक आहे.
BSF Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरती ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF Requirment 2025)अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणून उमेदवारांना आपले अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत.
- उमेदवारांनी आपला अर्ज करण्यासाठी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहेत.
- ऑनलाईन अर्ज करताना चालू मोबाईल टाकणे अनिवार्य आहे.त्याच बरोबर ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रिंट घेणे महत्वाचे आहे.
- सदर भरतीसाठी पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
ही जाहिरात पण बघा: नवीन:बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025| Bank Of Maharashtra Bharti 2025|मासिक वेतन: 93,960 रुपये
आपल्या परिसरातील 10 वी/12 वी उत्तीर्ण उमेदवारांना ही जाहिरात नक्की शेअर करा 👇
Mujhe karna he sir