Railway Recruitment Board Bharti 2025: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड पॅरामेडिकल अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. सदर भरतीमध्ये “नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट (एंट्री ग्रेड), रेडिओग्राफर (एक्स-रे टेक्निशियन), लॅब असिस्टंट ग्रेड-II, डायलिसिस टेक्निशियन, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड-II, ECG टेक्निशियन” ही पदे भरण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती ही रेल्वे रिक्रूटमेंट(Railway Recruitment Board Bharti 2025) बोर्ड पॅरा मेडिकल च्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: विविध जागांसाठी भरती (RRB Paramedical Bharti 2025)
- एकूण जागा: 0434 जागा
- भरती विभाग: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड पॅरामेडिकल अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- वयोमर्यादा:
- उमेदवारांचे 18 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असावे.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्ष सूट.
- ST/SC उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Railway Recruitment Board Bharti 2025
पद क्रं | पदाचे नाव | पद संख्या |
01 | नर्सिंग अधीक्षक | 272 |
02 | डायलिसिस तंत्रज्ञ | 04 |
03 | आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्राहक II | 33 |
04 | फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी) | 105 |
05 | रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ | 04 |
06 | ईसीजी तंत्रज्ञ | 04 |
07 | प्रयोगशाळा सहाय्यक श्रेणी II | 12 |
(अत्यंत महत्वाचे: सदर भरती व रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड पॅरा मेडिकलच्या अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे.आपला अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात सविस्तर वाचावी. कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा गैरसमजसाठी आमची टीम जबाबदार असणार नाही.)
- शैक्षणिक पात्रता:
- नर्सिंग अधीक्षक: GNM/BSC Nursing
- फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी): फार्मसीमध्ये पदवी/डिप्लोमा.
- रेडिओग्राफर (एक्स-रे टेक्निशियन): संबंधित विषयात डिप्लोमा.
- आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक ग्रेड-II: रसायनशास्त्रासह BSC.
- प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड-II: DMLT
- डायलिसिस टेक्निशियन: BSC आणि हेमोडायलिसिसमध्ये डिप्लोमा.
- ईसीजी टेक्निशियन: संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा.
- मासिक वेतन:
- नर्सिंग अधीक्षक: दरमहा 44900 रुपये.
- फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी): दरमहा 29200 रुपये.
- रेडिओग्राफर (एक्स-रे तंत्रज्ञ): दरमहा 29200 रुपये.
- आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक श्रेणी-II:दरमहा 35400 रुपये.
- लॅब असिस्टंट श्रेणी-II: 21700 रुपये.
- डायलिसिस तंत्रज्ञ: दरमहा 35400 रुपये.
- ईसीजी तंत्रज्ञ:दरमहा 25500 रुपये.
- अर्ज शुल्क:
- सामान्य गट/OBC /EWS उमेदवारांसाठी: 500 रू शुल्क.
- SC/ ST/EBC /ESM उमेदवारांसाठी: 250 रू शुल्क.
- सर्व महिला श्रेणी उमेदवार, अल्पसंख्याक / तृतीय लिंग उमेदवारांसाठी: 250 रू शुल्क.
- निवड पद्धती: (RRB)
- लेखी परीक्षा (written Exam)
- कागदपत्रांची पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी ( Medical Examination)
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने भरायचे आहेत.
🗓️महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्यास सुरुवात: 09 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील.
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:10 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज शुल्क भरता येईल.
RRB Paramedical Bharti 2025
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांचे बायोमेट्रिक तपशील नोंदवले जातील. जर काही जुळत नसेल तर, संबंधित आरआरबी (RRB)उमेदवाराला अपात्र ठरवण्याचा आणि त्या आधारावर योग्य कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवतील.
- उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आणि कोणत्याही उमेदवाराची पार्श्वभूमी तपासणी करण्यासाठी अतिरिक्त प्रमाणीकरण प्रक्रिया करण्याचा अधिकार आरआरबी (RRB)राखून ठेवतात.
- Railway Recruitment Board कोणत्याही टप्प्यावर अतिरिक्त CBT/DV (आवश्यकतेनुसार) करण्याचा अधिकार राखून ठेवतात.
- उमेदवारांची पात्रता,ऑनलाइन अर्ज स्वीकारणे किंवा नाकारणे, मोफत रेल पास देणे, खोट्या माहितीसाठी दंडात्मक कारवाई, रिक्त पदांमध्ये बदल, निवडीची पद्धत, CBT चे आयोजन, परीक्षा केंद्रांचे वाटप, निवड, निवडलेल्या उमेदवारांना पदांचे वाटप इत्यादी सर्व बाबींमध्ये RRB चा निर्णय अंतिम आणि उमेदवारांवर बंधनकारक असेल आणि या संदर्भात RRB कडून कोणतीही चौकशी किंवा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- कोणत्याही अनवधानाने/टायपोग्राफिकल चुकांसाठी RRB जबाबदार राहणार नाही.
- सदर भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी चालू मोबाईल नंबर तसेच वैध ईमेल (Email)आयडी असेल आवश्यक आहे.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील मूळ जाहिरात pdf सविस्तर वाचावी.
RRB paramedical Bharti 2025
ही जाहिरात पण बघा: ठाणे महानगरपालिका भरती 2025| तब्बल: 01773 रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध
आपल्या परिसरातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना ही जाहिरात नक्की शेअर करा 👇
Mr_ritesh_3333