Maharashtra Jalsampda Vibhag bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑफलाईन (Offline) स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. हे भरती महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीचे सविस्तर माहिती खाली दिलेल्या (pdf) जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात (pdf) सविस्तर वाचावी.
- पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता
- एकूण जागा: 05
- शैक्षणिक पात्रता: पदाची आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
- इतर पात्रता: 03 वर्षाचा जलसंपदा विभागात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- मासिक वेतन: शासकीय नियमानुसार योग्य वेतन दिले जाईल.
- अर्ज पद्धती: ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- भरती कालावधी: सदर भरती 01 वर्षासाठी केली जाईल
- नोकरी ठिकाणी: नाशिक
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी इमारत, दिंडोरी रोड, नाशिक – 422004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2025 (साय. 05 वाजेपर्यंत)
🔕उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
- सदर नेमणुक एक वर्षासाठीच राहील. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी वाढविण्याची आवश्यकता भासल्यास संबंधीतांचे कामकाज व आवश्यकता पाहून नियुक्ती अधिकारी शासन मान्यतेने तसा निर्णय घेऊ शकतात.
- करार पध्दतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमणूक दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधीत व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र अटी व शर्ती संबंधीत उमेदवाराला मान्य आहेत. या बाबत बंधपत्र उमेदवारास 100 रुपये च्या स्टॅम्पपेपरवर देणे बंधनकारक राहील.
- सदर नियुक्ती अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, मेरी नाशिक येथे विवक्षीत कामासाठी करण्यात येत असून त्यासाठी योग्य उमेदवार न भेटल्यास सेवा करार पध्दतीने भरावयाची पदे रिक्त ठेवण्याचा अधिकार अबाधित राहील.
- करार पध्दतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांस कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार राहणार नाहीत.
- उपरोक्त अटी व शर्ती व्यतिरिक्त शासन / नियुक्ती अधिकारी वेळोवेळी ठरवतील त्या अटी व शर्ती अंतिम राहतील.
ही जाहिरात अधिक व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा
1 thought on “महाराष्ट्र शासन: जलसंपदा विभाग अंतर्गत नवीन भरती प्रसिद्ध|Jalsampda vibhag bharti 2025”