GMC Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांसाठी नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव भरती मंडळ, जळगाव यांनी जुलै 2025 च्या जाहिरातीत एकूण 019 रिक्त पदे आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे.
- पदाचे नाव:- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
- एकूण जागा :- 019
- शैक्षणिक पात्रता:-
- प्राध्यापक: एमएस / एमडी / डिप्लोमा / बॅचलर डिग्री / मास्टर्स डिग्री / एमबीबीएस / एम.एससी. / पीएच.डी. / डी.एससी. / संबंधित विषयात डीएनबी.
- सहाय्यक प्राध्यापक: एमडी / डिप्लोमा / बॅचलर डिग्री / संबंधित विषयात डीएनबी.
- मासिक वेतन:- 1,70,000 रु.ते 1,85,000/- रुपये पर्यंत.
- वयोमर्यादा:- 69 वर्षापर्यंत
- भरती कालावधी:- तात्पुरत्या स्वरुपात
- नोकरी ठिकाण :- जळगांव
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF येथे बघा | येथे क्लिक करा |
- अर्ज पद्धति:- ऑफलाईन पद्धतीने (Offline)
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:- 4 ऑगस्ट 2025
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हापेठ, शासकीय रुग्णालय परिसर, जळगाव-425001
🔕 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव आस्थापनेवरील वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा या करीता चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ही पदे करार तत्वावर निव्वळ 365 दिवसांकरीता तात्पुरत्या स्वरुपाच्या नियुक्तीने भरण्याच्या अनुषंगाने त्या-त्या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांबरोबरच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने विहीत केलेली आवश्यक शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा धारण करणारे खाजगी वा अन्य क्षेत्रातील उमेदवारांना कडुन अर्ज मागविण्याकामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव या संस्थेच्या www.gmcjalgaon.org या संकेत स्थळावर तसेच मा. संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेत स्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
- ही जाहिरात पात्र उमेदवारांपर्यंत नक्की पोहचवा.👇